करमाळा प्रतिनिधी

डॉ.शहीद नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारणीची बैठक ३१ मे ते १ जून या कालावधीत शहादा जिल्हा (नंदुरबार) येथे होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी दिली. शहादा येथे होत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठकीच्या नियोजनासाठी दिनांक २७ मे रोजी सायंकाळी ५:०० वा.करमाळा शाखेची बैठक मा. प्राचार्य नागेश माने यांच्या निवासस्थानी नागेश माने सर यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आलेली होती. या बैठकीस दिगंबर साळुंखे बापू यांची नूतन कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या माध्यमातून महा. अनिसचा विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल करमाळा शाखेस लक्षवेधी शाखा पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात येत असल्याची माहिती राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद यांनी पत्राद्वारे दिली. शहादा जिल्हा नंदुरबार येथे होत असलेल्या विस्तारित राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये हा पुरस्कार दिनांक ३० मे २०२५ रोजी वितरित करण्यात येणार आहे. या बैठकीस बाळासाहेब दुधे, संजय हंडे, दिगंबर साळुंके, अनिल माने, संतोष कांबळे, राजेंद्र साने, सुनील गायकवाड, गजेंद्र गुटाळ सर, अशोक काळे, शशिकला गुटाळ, तापन फंड, संगीता निंबाळकर आदी जन उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *