करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगर परिषदेने शासनाच्या अनुदानातून मंजूर झालेले किल्ला विभाग येथील मारुती मंदिर परिसरात काँक्रीटकरण करणे हे काम गेले सहा महिने पासून ठेकेदाराने केले नसुन ते काम येत्या आठ दिवसात सुरू न झाल्यास सतरा मार्च २०२५ रोजी सकाळी 11 वा. करमाळा नगरपरिषद कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांच्यावतीने कार्यालय अधीक्षक कविटकर यांच्याकडे करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी केली आहे. यावेळी न.प. चे बांधकाम अभियंता आकाश वाघमारे उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत सन 2023 – 24 या आर्थिक वर्षांमध्ये किल्ला विभाग येथील मारुती मंदिर परिसरात काँक्रिटीकरण करणे हे काम मंजूर झाले होते, सदरचे कामाची निविदा दिनांक 14 जुलै २०२४ रोजी जाहीर निविदा चे प्रसिध्दीकरण झाले असून यामध्ये प्रीतम किशोर भगत या ठेकेदारास हे काम मंजूर झाले असून दिनांक सात ऑगस्ट 2024 रोजी नगरपरिषदेने सदर ठेकेदारास वर्क ऑर्डर दिली होती परंतु ठेकेदारानी अद्याप पर्यंत कोणतेही काम केलेले दिसून येत नाही सदर ठेकेदाराची दिनांक सहा फेब्रुवारी २०२५ अखेर  कामाची मुदत संपलेली असून अद्याप पर्यंत ठेकेदाराला कामासंदर्भात नगरपालिकेने साधी नोटीस दिली नाही पालिका चे अभियंता चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे तसेच नगरपरिषदेने  येत्या आठ दिवसात काम सुरू न केल्यास करमाळा नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पोलिस प्रमुख ग्रामीण सोलापूर, तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *