
संचालक मंडळाच्या चुकीच्या निर्णयामुळे आदिनाथ कारखान्याचे नुकसान??बचाव समितीचा आरोप/कारखाना व्यवस्थित चालू आहे बचाव समितीने भंपक बाजी करू नये संचालक मंडळ
करमाळा प्रतिनिधी
सहकारी साखर कारखान्याच्या एक ते पंचवीस किलोमीटर अंतरावर एक लाख मॅट्रिक टन ऊस असून या ऊस वाहतुकीसाठी प्रति टन 25 किलोमीटर अंतराच्या दराने वाहतूक दिली तर जवळपास एक लाख मेट्रिक टनाचे ऊस गाळप आदिनाथ चे अजून होऊ शकते मात्र जाणीवपूर्वक आदिनाथ कारखाना अडचणीत आणायचे ही भूमिका अजूनही संचालक मंडळ सोडत नसून संचालक मंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे आदिनाथ पुन्हा नुकसानीत जाईल का अशी भीती निर्माण झाली आहे असा आरोप बचाव समितीचे निमंत्रक हरिदास डांगे व अध्यक्ष महेश चिवटे यांनी केला आहे
गेल्या दहा दिवसात साखर हमालीचे टेंडर देण्यात संचालक मंडळात वाद झाल्यामुळे साखर जाम झाल्यामुळे गाळप कमी झाले

एकंदरीत संचालक मंडळ बचाव समितीला विश्वासात न घेता अजूनही राजकीय स्वार्थासाठी चुकीचे निर्णय घेऊन आदिनाथ अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत वारंवार सूचना देऊन सुद्धा संचालक मंडळ बचाव समितीच्या सूचना कडे दुर्लक्ष करतात
संचालक मंडळाच्या बैठकीला समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलवत नाहीत
आज आदिनाथ कारखान्याच्या कंपाऊंड शेजारचा ऊस बाहेरचे कारखाने घेऊन जात आहे केवळ वाहतुकीचे दर निश्चित न केल्यामुळे दुसऱ्या कारखान्याला जात आहे
एक ते 25 किलोमीटर अंतराच्या दरम्यानच्या सर्व उसाला 25 किलोमीटर प्रमाणे वाहतूक दिली तर दररोज कारखाना 3500 मॅट्रिक टन उसाचे गाळप करेल
कडे जाणीवपूर्वक संचालक मंडळ दुर्लक्ष करत आहे

याच पद्धतीने माळीनगर म्हैसगाव कमलाई या कारखान्याने धोरण करून उसाची गाळप वाढवले आहे आजूबाजूचे कारखाने आदिनाथ ला अडचणीत आणण्यासाठी याच परिसरात जास्त वाहने टाकत आहेत याची जाणीव संचालक मंडळाला असताना सुद्धा संचालक मंडळ डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत आहे
यामुळे विद्यमान संचालक मंडळाला आदिनाथ कारखाना चालवायचा आहे का अजून बंद पाडायचा आहे याबद्दल शंका निर्माण होत आहे ची शंका ही बचाव समितीने व्यक्त केली आहे
बचाव समितीच्या वतीने संपूर्ण आदिनाथ चे कामकाजाची पाहणी करण्यात आली
रसायन तज्ञ श्री खाडे मॅनेजर श्री आटोळे उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी कारखान्याची माहिती

……
डांगे व चिवटे यांनी पुर्ण माहिती घ्यावी आम्ही सर्व संचालक मंडळ एक दिलाने काम करित आहे डांगे सो गेले एक आठवडा झाले एकडे फिरकले सुध्दा नाही- धनंजय डोंगरे चेअरमन श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना, करमाळा
……
नऊ दहा कोट रुपये डांगे यांच्या सुचनेनुसार खर्च केला आहे त्यांनी आदिनाथ मंदिरात एक कोट रुपये देतो म्हणाले आजुन दिले नाही असे अनेक मान्यवर म्हणाले होते त्यांनीही दिले नाही आता बचाव समितीने भंपक बाजी करु नये कारखाना व्यवस्थित चालू आहे-रमेश कांबळे व्हा चेअरमन श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना, करमाळा