
करमाळा प्रतिनिधी
करमाळा पोलीस ठाणे गुरनं 05/2025 भा.द.वि. कलम 318 (4), 316(2),3(5) प्रमाणे फिर्यादीः- मनोज भैरवनाथ शिंदे, वयः 28 वर्षे, धंदाः खाजगी नोकरी, रा. मु.पो. जातेगाव, ता. करमाळा

आरोपी:- 1) सोनु सव्हीसेस कंपनी, सोलापूर, तीचे मालक अशपाक शेख, रा. सोलापूर 2) सुपरवायझर इकबाल इनामदार, रा. कोर्टी, ता. करमाळा
गु.घ.ता.वेळ ठिकाणः- नोव्हेंबर 2023 ते दिनांक 03/01/2024 रोजी सकाळी 10/00 वा. पर्यत फिर्यादीचे मोबाईल वरुन तसेच रोख जातेगाव ता. करमाळा
विलंबाचे कारणः- फिर्यादीकडुन
दिशा अंतर उत्तरेस 15 कि.मी.
हकीकतः- यात हकीकत अशी की, माहे नोव्हेंबर 2023 ते आजपावेतो सोनु सव्हीसेस या कंपनीचे मालक अशपाक शेख यांचे मागणीप्रमाणे कंपनीचे सुपरवायझर इकबाल इनामदार यांनी फिर्यादीला कामावरुन न काढण्यासाठी तसेच त्यांचा पगार करण्यासाठी फिर्यादीकडुन वेळोवेळी फोन पे व रोख स्वरुपात माझेकडुन 28,500/- रु. घेवुन तसेच फिर्यादीने काम केलेले असताना फिर्यादीचा तीन महिण्यांचा अंदाजे 40,000/- रु. पगार न देवुन फिर्यादीच्या पैशांचा अपहार करुन फिर्यादीची फसवणुक केली आहे म्हणुन फिर्यादीची सोनु सव्हीसेस कंपनी, सोलापूर, तीचे मालक अशपाक शेख, रा. सोलापूर व सुपरवायझर इकबाल इनामदार, रा. कोर्टी, ता. करमाळा यांचेविरुध्द फिर्याद आहे. म्हणुन वगैरे म। ची तक्रार आल्याने नमूद गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोसई मदने हे तपास करत आहेत.