
करमाळा प्रतिनिधी
जिजाऊ जयंती निमित्त विधायक उपक्रम घेत शिवस्फूर्ती समूहाचे वतीने कुंभेज येथे रक्तदान शिबीर शहीद जवान वीर पत्नी राणीताई काटे यांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाले. करमाळा तालुक्यातील माजी सैनीकांची कार्यक्रमास उपस्थिती होती. शिबीरा दरम्यान सर्वधर्मीय 102 रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान केले. करमाळा येथील कमलाभवानी ब्लड बँकेने रक्त संकलनासाठी सहकार्य केले. यावेळी पोफळज येथील श्वेता शिवाजी पवार व पल्लवी कुमार कादगे या मुलींनी जिजाऊंची वेषभूषा साकारली. उपस्थितांनी जिजाऊ वंदना करून प्रतिमा पूजन केले. यावेळी ऋषीकेश भोसले याने दिलेली शिव गारद लक्षवेधक होती या प्रसंगी करमाळा टी.व्ही.9 चे वार्ताहर शितलकुमार मोटे, फुटबॉल खेळात राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळवून देणारा वेदांत आप्पासाहेब काटे, पंजाब ग्रामीण बँकेत मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल श्रीराम भोसले यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. शिवस्फूर्ती समूहाचे वतीने सर्व उपस्थित सर्व मान्यवरांना आणि रक्तदात्यांना जिजाऊंची शिकवण हा ग्रंथभेट देण्यात आला. शिवस्फूर्ती समूह सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवश्री अनिल कादगे यांच्या पुढाकारातून आणि मित्रपरिवाराच्या सहकार्याने हा उपक्रम प्रतिवर्षी नियमित सुरु आहे.

या कार्यक्रमाला अध्यक्ष पठाडे, सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अक्रुर शिंदे, सचिव बिभिषण कन्हेरे, सुरेश आदलिंग, सुभाष मुटके, भारत कादगे, सुनिल बापू सावंत, प्रविण भोसले, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, आदर्श शिक्षीका रेखा साळुंके, डॉ. राजेंद्र शिंदे, म.पो.नि. परमेश्वर कादगे, गणेश शिंदे, अमोल मुटके, आण्णासाहेब भोसले, उपसरपंच संजय तोरमल, विनोद कादगे, कुमार कादगे, रवी काटे, ब्लड बँकेचे निलेश पाटील, भारत पवार, महावीर भोसले, संभाजी भोसले, किरण शिंदे, वैभव साळुंके, संतोष महाराज, श्रीराम शिंदे, सुदेश माने उपस्थित होते.

……………………………..
महापुरुषांच्या स्मृती विधायक उपक्रमांद्वारे जपायला हव्यात या उद्देशाने प्रतिवर्षी जिजाऊ जयंती चे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असतो.
– अनिल कादगे,जिल्हाध्यक्ष शिवस्फूर्ती समूह सोलापूर जिल्हा