कमलाई नगरी

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर आज मकर संक्रांतीनिमित्त श्री जगदंबा कमलादेवी महापूजा भोगी मंदिर समितीचे सचिव अनिल महादेव पाटील व ॲड लता अनिल पाटील यांच्या शुभहस्ते महापूजा भोगी करण्यात आली. मकर संक्रांतीनिमित्त श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीचे महिला कर्मचारी यांना साडी ॲड. लता अनिल पाटील यांच्या हस्ते भेट देण्यात आली. श्री कमला देवी मंदिरामध्ये आज संक्रांत निमित्त महिलांची प्रचंड अशी गर्दी होती. या निमित्ताने करमाळा पोलीस स्टेशन करमाळा येथे पोलिस अधिकारी यांच्या कडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

तसेच श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट तर्फे मातोश्री वृद्धाश्रम पांडे येथील वृद्ध महिलांना साडी वाटप मंदिर समितीचे विश्वस्त ॲड श्री.शिरीषकुमार भानुदास लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री जगदंब कमला देवी मंदिर समितीचे व्यवस्थापक अशोक गाठे, मदतनीस लक्ष्मण हवलदार उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *