करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील मराठी विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्यासाठी विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो. या भित्तिपत्रकामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे.

या भीतीपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी .पाटील सर यांच्या हस्ते झाले.

यावेळी यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा. तळपाडे एन.एल., प्रा. प्रमोद शेटे, डॉ. वंदना भाग्यवंत, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.

कृष्णा कांबळे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.ए.पी. माने, इतिहास विभागप्रमुख प्रा. सरला चव्हाण, डॉ.ए.टी.करपे, प्रा.जी.एस. खरात तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना भाग्यवंत यांनी तर आभार प्रा. प्रमोद शेटे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *