
करमाळा प्रतिनिधी
श्रद्धेय वसंतराव दिवेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त वसंत महोत्सव चे निमित्त साधून मुथा अबॅकस अकॅडमी ने बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन केले.

जुलै महिन्यामध्ये अरिस्टो किड्स मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा आयोजित आंतरराष्ट्रीय ऑनलाइन परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण 2350 विद्यार्थ्यांचा सहभाग विविध राज्यातून तसेच देशातून होता. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सात मिनिटांमध्ये 100 गणिते अचूक सोडवणे बंधनकारक होते. या परीक्षेचा सराव होण्यासाठी एक ते दीड महिना अगोदर ऑनलाईन मॉक टेस्ट च्या माध्यमातून अनलिमिटेड टेस्ट वेबसाईटवर पुरवण्यात आलेल्या होत्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी खूप जास्त प्रॅक्टिस करून पाच ते सहा मिनिटात शंभर गणिते सोडवण्याचा सराव केला व भरघोस बक्षिसे करमाळा येथील मुथा अबॅकस अकॅडमी ला मिळवून दिले. या सर्व विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा यश कल्याणी सेवाभावी सदन येथे उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद फंड सर होते तर प्रमुख उपस्थिती डॉ. प्रचिती पुंडे, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, डॉ. सुनिता जोशी, एड. रवींद्र बर्डे सर, मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर, प्रा. एम. व्ही. कांबळे सर, प्रा. विटूकडे सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी व सुवर्णपदक देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा अप्रतिम डेमोचे सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेटर च्या अगोदर करेक्ट उत्तरे देऊन मान्यवरांना आश्चर्यचकित केले.

या कार्यक्रमासाठी आवर्जून मिरजगाव येथील वृषभ भंडारी सर व भिगवन येथून ऐश्वर्या रायसोनी मॅडम ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी प्रचंड पालकांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेले विद्यार्थी
सार्थक मकरंद वनारसे (अबॅकस लेवल 5 मध्ये 1st रँक, ग्रँड चॅम्पियन मध्ये 1st रँक आणि वेदिक मॅथ्स 2 मध्ये 3 rd रँक), आर्यन शामराज कापसे (ग्रँड चॅम्पियन मध्ये 1st रँक, अबॅकस लेवल 2 मध्ये 5th रँक आणि अबॅकस लेवल 1 मध्ये Prodigy award), शर्वरी रोहित शिंदे (ग्रँड चॅम्पियन मध्ये 1st रँक आणि अबॅकस लेवल 0 मध्ये Prodigy award), जानवी राहुल सावंत (अबॅकस लेवल 1 मध्ये 2 nd रँक), विश्वजीत गणेश कामटे (अबॅकस लेवल 3 मध्ये 1st रँक), स्पंदन बापू घरबुडे (अबॅकस लेवल 4 मध्ये 1st रँक), शरयू रघुनाथ फरतडे (अबॅकस लेवल 2 मध्ये 2nd रँक, ग्रँड चॅम्पियन मध्ये Shining star आणि अबॅकस लेवल 3 मध्ये Prodigy award), यश सुरेश भांडवलकर (अबॅकस लेवल 4 मध्ये 2nd रँक आणि वैदिक मॅथ्स मध्ये 5th रँक), हर्ष पुष्कराज शहा (अबॅकस लेवल 5 मध्ये 1st रँक), आदित्य सुहास कापसे (वेदिक मॅथ्स मध्ये 1st रँक आणि अबॅकस लेवल 5 मध्ये 2nd रँक), आर्यन तात्यासाहेब जाधव (अबॅकस लेव्हल 1 मध्ये 3rd रँक), साई सागर काळे (अबॅकस लेवल 2 मध्ये 3rd रँक आणि अबॅकस लेवल 3 मध्ये Shining star), हार्दिक दीपक कदम (अबॅकस लेवल 4 मध्ये 3rd रँक, अबॅकस लेवल 5 मध्ये Shining star आणि वैदिक मॅथ्स 1 मध्ये 4th रँक), अनुजा लक्ष्मण भोसले (अबॅकस लेवल 1 मध्ये 4th रँक), रिदम भूपेंद्र बोराडे (अबॅकस लेवल 2 मध्ये 4th रँक), सार्थक सचिन दवणे (अबॅकस लेवल 1 मध्ये 5th रँक), सृष्टी गणेश कामटे (अबॅकस लेवल 3 मध्ये 5th रँक), सई विनोद पडवळे (अबॅकस लेवल 4 मध्ये 3rd रँक), ईश्वरी भारत मुकणे (अबॅकस लेवल 4 मध्ये 3rd रँक), समीक्षा महेश थोरे (अबॅकस लेबल 4 मध्ये 3rd रँक), ऋग्वेद दत्तात्रय कांबळे (वैदिक मॅथ्स मध्ये 3rd रँक), सार्थक संजय करंडे (अबॅकस लेवल 4 मध्ये 3rd रँक), शायनिंग स्टार अवॉर्ड चे मानकरी तन्मय अरुण चोपडे, प्रणाली बापू रोकडे, समर राजेश संचेती, श्रावणी रामेश्वर खराडे, ऋषीराज वीरेंद्र लष्कर, काव्या टिळेकर, समर्थ नवनाथ अभंग, श्रावणी महेश गवळी, अक्षरा छगन माने, पायल अनिल बिनवडे, असद फिरोज शेख, सार्थक नागेश सालगुडे, श्रेयश सचिन शिंदे, तेज प्रताप महावीर कोळेकर, कार्तिक किशोर कदम, करुणा उमेश माने, अवधूत रमेश भांडवलकर, वेदांती चंद्रहास निमगिरे, श्रावणी महेश अभंग, खुशी पुष्कराज शहा, श्लोक दत्तात्रय कांबळे, भक्ती संजय सावंत, राजनंदनी अभिजीत सावंत, दिया तरुण पटेल, प्रोडिगी अवॉर्ड चे मानकरी आर्वी महावीर सोळंकी, यश नरेश शहा, आरुष बलभीम बनसोडे सहभागी विद्यार्थी राज दादा गाडे, यश दादा गाडे, शंभूराजे प्रफुल्ल शिंदे, आनंद नागेश गोसावी, तेजस्विनी अभिजीत सावंत, हर्षल धीरज सोळंकी, समर संचेती, शिवतेज वर्धमान जाधव, स्वरा सुरेश फंड, ओजस केतन गांधी, अर्णव स्वप्नील मोदी, रवन्नाथ नवनाथ अभंग, वाणीश्री अमोल घाडगे, सोफिया अब्दुल समेद, यश अनिल बिनवडे, देवेन वर्धमान शहा, ईशा पोपट टिळेकर.
या सर्व विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन क्लासच्या संस्थापिका ज्योती मुथा तसेच स्मिता वनारसे, सायली गुगळे, पूजा शिंदे, वैष्णवी कानडे या सर्व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या शिंदे मॅडम यांनी केले.