करमाळा प्रतिनिधी
श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजकाने श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या सात महिन्यांपासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून प्रविण बाळासाहेब जगताप रा. बारामती यांचे कडून रू. २१००/_ ( दोन हजार शंभर फक्त) गुरुवार दि.२२/०८/२०२४ रोजी देणगी प्राप्त झाली आहे.
या निमित्त त्यांचा सत्कार श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आला आहे. यावेळी रघुनाथ खटके, रोहीत पुजारी, सचिन सोरटे, धनंजय सोरटे, राहुल पवार, प्रविण (पप्पु) हिरगुडे, दिपक थोरबोले, प्रदिप सोरटे, राजेंद्र बिडवे, शेखर पवार व श्री देवीचामाळ ग्रामस्थ व भक्तगण उपस्थित होते.
या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णोधाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४