
करमाळा प्रतिनिधी
करमाळा चिखलठाण एसटीचा जॉइंड शेटफळ येथे तुटला आहे व शाळेच्या मुलांची गैरसोय होत आहे. कुगाव व चिखलठाण नं. 2 या शाळेच्या विद्यार्थ्यांचे पेपर चालू आहेत व एसटी टायमाला येत नाही. करमाळा एसटी डेपो च्या बसेसची अशीच अवस्था

झाली आहे. कुठे टायर फुटला, कुठे पंचर झाली, रस्ता चांगला असताना देखील त्यांचे घोटाळे होत आहेत. याला जबाबदार कोण असे अर्जुन शंकर खरात पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य सदस्य यांनी सांगितले आहे.


