
करमाळा प्रतिनिधी
महादेव गबाजी कांबळे हे मागासवर्गीय शेतकरी असून वांगी नं. १ येथील शेतजमीन गट नं. 385, 387 व 397 मधून मुख्यमंत्री ग्रामसङक योजनेतून होत असलेल्या रस्त्यास विरोध करण्यासाठी समस्त महारवतन कब्जेवहिवाट यांच्यातर्फे महादेव गबाजी कांबळे हे मागासवर्गीय शेतकरी तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर चक्री उपोषणास बसलेले असून त्यांनी या शेतजमिनीसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष केला आहे.

या उपोषणास रिपाई (आ) चा जाहीर पाठिंबा असून सबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास १९/०६/२४ रोजी दु १२:३० वा. करमाळा तहसील कचेरीवर हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा नागेश कांबळे यांनी दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, बेकायदेशीर बळजबरीने शेतीची नासधूस करीत रस्ता बनविणाऱ्या शासनप्रशासनातील सबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन नुकसान भरपाई देण्यात यावी.
सदरील निवेदनाच्या प्रती तहसील कार्यालय, करमाळा पोलीस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.
